संस्कारभारतीच्या रांगोळ्या - ८

रांगोळी हा चित्रकलेतील अतिशय उपयुक्त व सोपा प्रकार असून संस्कारभारतीच्या रांगोळ्या फार प्रसिद्ध आहेत. आपल्या घरासमोर रांगोळी काढून चित्रकलेतील कौशल्य दाखविता येते. संस्कारभारती ही कलेच्या माध्यमातून संस्कार करणारी अखिल भारतीय संस्था आहे.संस्कारभारतीच्या रंगावलीमध्ये वापरली जाणारी भारतीय संस्कृतीमधील पवित्र चिन्हे व त्यांचा उपयोग करून काढलेल्या रांगोळ्या संदर्भः "॥ संस्कार भारती ॥ रंगावली" या संस्कार भारती या संस्थेच्या मान्यताप्राप्त पुस्तकावर या विभागातील माहिती आधारित आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. किरण धर्माधिकारी असून हे पुस्तक नलिनी वस्तू भांडार, ११० बी, महाद्वार, कोल्हापूर यांचेकडे मिळू शकते. यातील काही नमुने खाली दाखविले आहेत.