कोल्हापूर जिल्हा

प्राचीन काळापासून कोल्हापूरचा इतिहास, कोल्हापूरची वैशिष्ठ्ये, शहरातील तसेच कोल्हापूर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, किल्ले, तीर्थक्षेत्रे यांची सचित्र माहिती या वेबसाईटवर आहे. सर्व महत्त्वाचे फोन व संपर्क पत्ते यात आहेतच शिवाय फोटोगॅलरी, विनोद, सिनेमा यासारखी मनोरंजनपर माहिती इत्यादी अनेक आवश्यक माहिती ज्ञानदीप इन्फोटेकने डिझाईन केलेल्या माय कोल्हापूर डॉट नेट या वेबसाईटवर आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे घेतलेल्या वेबसाईट स्पर्धेत या वेबसासाईटला पारितोषिक मिळाले आहे. नुकत्याच घडून गेलेल्या प्रलयंकारी महापूराचे रौद्ररूप दर्शविणार्‍या छायाचित्रांचा संग्रहही या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या वेबसाईटचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कोल्हापूरचा नकाशा. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा माहिती पूर्ण नकाशा तयार केला असून यात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती तसेच त्याचे स्थान पाहता येते. या नकाशावर व्यावसायिकांना आपली जाहिरात करण्याची सोय केल्यामुळे व्यवसायाचे स्थान, पत्ता व माहिती ग्राहकास पाहता येणार आहे. अशी सुविधा भारतातील फारच थोड्या वेबसाईटवर पहावयास मिळते. या अभिनव वेबसाईटवरील काही माहितीचे दुवे खाली दिले आहेत.

  1. कोल्हापूर शहर नकाशा
  2. कोल्हापूर जिल्हा नकाशा
  3. कोल्हापूरचा इतिहास