जेजुरी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर असलेले हे तीर्थक्षेत्र खंडोबाचे जागृत स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. धनगर कोळी तसेच इतर वर्गातील ज्ञातींचेही हे कुलदैवत असल्याने येथील खंडोबाच्या दूरदर्शनाठी दूरदूरहून भक्त येत असतात.
एका लहानशा पठारावर सुमारे तीनशे मीटर उंचीवर डोंगराच्या कडे पठारावर हे खंडोबाचे मुख्य देऊळ आहे. प्रवेश द्वाराशीच नगारखाना आहे. देऊळ पूर्वाभिमुख असून ते विस्तृत आहे. देवळासमोर भले मोठे पितळी पत्र्याने मढवलेले कासव आहे. त्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते.
चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध १२ ते वद्य १ असे पाच दिवस तर मार्गशीर्षात शुद्ध १ ते ६ असे सहा दिवस आणि नवरात्रात दसऱ्यापर्यंत दहा दिवस खंडोबाची यात्रा असते.