वैज्ञानिक खेळणी स्पर्धा

मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगलीतर्फे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अभिनव वैज्ञानिक खेळणी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

पुण्यातील आयुकामधील शास्त्रज्ञ श्री. अरविंद गुप्ता यांनी प्रदर्शित केलेली वैज्ञानिक खेळणी या संकेतस्थळावर दाखविली आहेत.

या खेळण्यापैकी कोणतीही खेळणी विद्यार्थ्यांकडून करवून घेऊन ती मराठी विज्ञान प्रबोधिनीकडे जमा करावीत. अशा खेळण्यांचे एक प्रदर्शन भरविले जाईल व सर्वात चांगल्या तीन खेळण्यांना पारितोषिके व भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात येतील..

शाळेने या स्पर्धेत भाग घेत असल्याचे कार्यवाह, मराठी विज्ञान प्रबोधिनीकडे २० ऑगस्ट२००९ पूर्वी कळवावे. खेळणी ३० सप्टेंबर २००९..
आपले.
प्रा. श्री. गो. कानिटकर. अध्यक्ष
अरविंद यादव. कार्यवाह

कार्यवाह, मराठी विज्ञान प्रबोधिनी,द्वारा - राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा,
पेठ भाग, सांगली - ४१६४१६