रेडिओ दुर्बीण - पुस्तक परिचय

रेडिओ दुर्बीण
सुधीर फाकटकर
मु. पो. खोडद
ता. जुन्नर, जि. पुणे
पिन ४१०५०४
दूरध्वनी - ( ०२१३२)२५२०१०
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

पुणे जिल्ह्यातील खोडद येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचा रेडिओ दुर्बीण प्रकल्प असून तेथे आकाशगंगेबाहेरून येणार्‍या रेडिओलहरींची नोंद घेण्यासाठी मीटर तरंग लांबीची महाकाय दुर्बीण बसविण्यात आली आहे. त्याठिकाणी कार्य करीत असणारे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ श्री. सुधीर फाकटकर यांनी सोप्या मराठी भाषेत रेडिओ दुर्बीण या विषयावर पुस्तक लिहिले आहे. रेडिओ दुर्बीण म्हणजे काय, तिचे प्रकार, रेडिओ लहरींची खगोलशास्त्रीय संशोधनासाठी असणारी उपयुक्तता, रेडिओ दुर्बीणीच्या प्रगतीचा इतिहास व भारतात या विषयावर चालू असणारे कार्य यासंबंधीची सविस्तर माहिती या पुस्तकात असून आकाशगंगा, रेडिओ तारका विश्वे, संशोधक तसेच जगातील रेडिओ दुर्बिणींची रंगीत छायाचित्रे यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना या नव्या विषयाची माहिती होण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त असून सर्वांना विकत घेण्यास शक्य व्हावे यासाठी पुस्तकाची किंमत केवळ ३० रुपये ठेवण्यात आली आहे. श्री. सुधीर फाकटकर यांना त्यांच्या या कार्याबद्दल धन्यवाद.
ज्ञानदीपच्या विज्ञानप्रसाराच्या कार्यात सहभागी होण्यास व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास त्यांनी संमती दिली असून शाळांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांचेशी संपर्क साधावा.
रेडिओ दुर्बीण - संपूर्ण पुस्तक वाचा.