शास्त्रीय कारणे द्या. भाग - ६

१०२ पितळेच्या भांड्यात ताक कळकते, मात्र कल्हई लावलेल्या भांड्यात ते कळकत नाही.
१०३ कमळाची पाने पाण्यावर तरंगतात.
१०४ मीठ घातलेले लोणचे बराच काळ टिकते.
१०५ पाव तयार होताना फुगतो.
१०६ क्रॅरम खेळताना बोर्डावर बोरिक पावडर टाकतात.
१०७ मोटारीचे ब्रेक दाबले की प्रवासी पुढे झुकताना.
१०८ चंद्रावर वस्तूचे वजन कमी भरते.
१०९ देवमासा अधूनमधून पाण्याच्या पृष्ठभागावर येतो.
११० ओलसर जागी बुरशीची वाढ चटकन होते.
१११ पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात.
११२ बर्फावर पोते वा लाकडाचा भुसा घालतात.
११३ नावाडी, होडी वल्हवण्यासाठी वल्ह्यांचा वापर करतात.
११४ पाल छतावर उलटी चालू शकते.
११५ मांजर उंचावरून पडले तरी त्याला फारसे लागत नाही.
११६ उन्हामुळे अंगावर घाम येतो.
११७ मधुमेही रूग्णास साखर वर्ज्य असते.
११८ थंड प्रदेशात सूचीपर्णी वृक्ष आढळतात.
११९ वाळवंटात निवडुंग वाढतात.
१२० हात लावला की लाजाळूची पाने मिटतात.