ठिपक्यांची रांगोळी
कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मापन पद्धतीनुसार (डावीकडून उजवीकडे व वरून खाली) ठराविक अंतराने म्हणजे पहिल्या ओळीसाठी x व y पिक्सेल (०,०),(५०,०)(१००,०) तर पहिल्या उभ्या रांगेसाठी x व y पिक्सेल (०,०) (०,५०)(०,१००) अशा अंतरावर ठिपके काढत येतील. असे आडव्या व उभ्या ओळींमध्ये सारख्या अंतरावर पाचपाच ठिपके काढा.
आता आडव्या व उभ्या रांगेतील पहिल्या ठिपक्यास (१,१), पहिल्या आडव्या ओळीतील दुसर्या ठिपक्यास २,१ तर दुसर्या ओळीतील पहिल्या ठिपक्यास १, २ याप्रमाणे ठिपक्यांना नावे द्या.
आता पहिल्या आडव्या ऒळीत (१,१)(२,१)(३,१)(४,१)(५,१) तर शेवटच्या आडव्या ऒळीत (५,१)(५,२)(५,३)(५,४)(५,५) असे ठिपके असतील.
याठिपक्यांना जोडणार्या रेषा काढून रांगोळ्या काढता येतील.
स्वस्तिकसाठी खालील सहा रेघा काढाव्या लागतील.
पहिली रेघ - (३,१) ते (३,५)
दुसरी रेघ - (१,३) ते (५,३)
तिसरी रेघ - (३,१) ते (५,१)
चौथी रेघ - (५,३) ते ( ५,५)
पाचवी रेघ - ( ३,५) ते (१,५)
सहावी रेघ - (३,१) ते (१,१)
आता स्वस्तिक असे दिसेल.
पीएचपी प्रोग्रॅम व SVG वापरून असे स्वस्तिक काढलेले पहा.