कागदाचे विमान

हवेत उडणारे विमान हा प्रत्येक मुलाचा कुतुहलाचा विषय असतो. असे विमान आपल्याला करता यावे असेही त्याला वाटते. कागदाचे विमान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण त्यापैकी एक सोपी कृती पाहणार आहोत.

एक लांबट आकाराची कागदाची पट्टी घ्या तिच्या एका टोकाकडील बाजूस आकृतीत दाखविल्याप्रमाणे घड्या घाला.



घडी उघडून व पुन: आतल्या बाजूस दुमडून दोन त्रिकोणी भाग करा.



वरच्या भागाचे दोन्ही कोपरे दुमडून एकासएक जुळवून घ्या व आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी करून व मागे दुमडून जाड चोच बनवा. आता वरचा भाग पंखाचा व मागचा पट्टीचा भाग शेपटाचा होऊन आपले विमान तयार होईल.



हवेत उडवून पहा. तोल सांभाळण्यासाठी शेपटाच्या भागाला योग्य आकार द्या वा मागे एखादा दोरा बांधून कागदाचा कपटा जोडा.