संस्कारभारतीच्या रांगोळ्या - १
रांगोळी हा चित्रकलेतील अतिशय उपयुक्त व सोपा प्रकार असून संस्कारभारतीच्या रांगोळ्या फार प्रसिद्ध आहेत. आपल्या घरासमोर रांगोळी काढून चित्रकलेतील कौशल्य दाखविता येते. संस्कारभारती ही कलेच्या माध्यमातून संस्कार करणारी अखिल भारतीय संस्था आहे.
बोधचिन्ह - कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथचक्र. परिघावरील १६ कीलक ( उंचवटे) हे १६ विद्यांचे प्रतीक आहेत. ते जेव्हा गतीमान होतात. तेव्हा रथ पुढे जातो आणि १६ गुणिले ४ म्हणजे ६४ दले दिसू लागतात. ही ६४ दले ६४ कलांचे प्रतीक आहेत.
संस्कारभारती गीत - साधयति संस्कारभारती भारते नव जीवनम्, सत्यं शिवं सुंदरं यांच्या अभिनव संस्कारातून भारतात नवजीवन निर्मिण्याचा प्रयत्न संस्कारभारती करीत आहे.
संदर्भः -
"॥ संस्कार भारती ॥ रंगावली" या संस्कार भारती या संस्थेच्या मान्यताप्राप्त पुस्तकावर या विभागातील माहिती आधारित आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. किरण धर्माधिकारी असून हे पुस्तक नलिनी वस्तू भांडार, ११० बी, महाद्वार, कोल्हापूर यांचेकडे मिळू शकते.