पिल्लांची फजिती

कोंबडीची पिल्ले निघाली किडे शोधायला. त्यांना दिसली एक लपलेली अळी. अळीला चोची मारत ओढताना कळले. ती अळी नसून उंदीरमामाची शेपटी होती. मग उंदीरमामाचे चावे चुकविण्यासाठी पळता भुई थोडी झाली.