पावस
|
|
पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात. मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत. |