अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग - भाग ८
Category: अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग
अँड्रॉईड प्रोग्रॅममध्ये प्रत्येक स्क्रीन डिस्प्लेसाठी एक वेगळी Activity किंवा विशिष्ट कृती सुरू करावी लागते. src फोल्डरमध्ये सर्व स्क्रीनसाठी Activityच्या वेगवेगळ्या जावा फाईल तयार कराव्या लागतात. एका Activity तून दुसर्या Activity साठी जाण्यासाठी Intent म्हणजे इच्छा व्यक्त करावी लागते.
समजा b2 नावाचे बटन आपण MainActivity.java या फाईलमध्ये तयार केले असेल व त्यावर क्लिक केले की आपल्याला SecondActivityसुरू करावयाची असेल तर त्याचा प्रोग्रॅम खालीलप्रमाणे लिहितात.
b2.setOnClickListener(new OnClickListener() {
@Override
public void onClick(View arg0) {
// TODO Auto-generated method stub
Intent i = new Intent(MainActivity.this, SecondActivity.class);
startActivity(i);
}
अल्लाउद्दीन आणि जादुचा दिवा या गोष्टीत ज्याप्रमाणे दिवा घासला की राक्षस प्रकट हॊई व अल्लाउद्दीनने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करी त्याप्रमाणे b2 बटन दाबले की (onClick) नवी इच्छा (new Intent) वेगळ्या नावाने (Intent i) सेव्ह करून ती Activity वा कृती करण्यासाठी startActivity(i) अशी आज्ञा दिली जाते.
MainActivity.java या मुख्य फाईलमध्ये b1, b2, b3 याप्रमाणे अनेक बटन तयार करून वेगवेगळ्या Activity सुरू करता येतात. वेबसाईटमध्ये ज्याप्रमाणे लिंक देऊन वेगवेगळी पेजेस जोडलेली असतात. त्याप्रमाणेच ही रचना असते.
शिवाय प्रत्येक वेगळ्या Activityमध्ये पाठीमागे जाण्यासाठी असेच एक बटन तयार करून ठेवले जाते. त्यामुळे वेबसाईटप्रमाणेच आपल्याला हवा तो स्क्रीन उघडता येतो तसेच आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कृती करता येतात.
अर्थात अँड्रॉईड प्रोग्रॅममधील सर्व Activities ची माहिती AndroidManifest.xml या फाईलमधे द्यावी लागते.
खाली AndroidManifest.xml या फाईलमधील application हा भाग दाखविला आहे. यात प्रथम प्रोग्रॅमचा बॅक अप घेण्याची अनुमती दिली आहे. प्रोग्रॅमसाठी कोणता लोगो वा चित्र वापरायचे हे drawable/ic_launcher ने दर्शविले आहे. प्रोग्रॅमचे नाव app_name हे strings.xml मधून व मजकूर मांडण्याची पद्धत वा स्टाईल AppTheme ही styles.xml या फाईलमधून घ्यावे हे सूचित केले आहे.
नंतरच्या activity परिच्छेदात अँड्रॉईड प्रोग्रॅममधील मुख्य फाईल कोणती (MainActivity) याची माहिती असून त्यासाठी intent.action.MAIN आणि intent.category.LAUNCHER ही वैशिष्ठ्ये सांगितली आहेत.
<application
android:allowBackup="true"
android:icon="@drawable/ic_launcher"
android:label="@string/app_name"
android:theme="@style/AppTheme" >
<activity
android:name="com.example.dnyandeep.MainActivity"
android:label="@string/app_name" >
<intent-filter>
<action android:name="android.intent.action.MAIN" />
<category android:name="android.intent.category.LAUNCHER" />
</intent-filter>
</activity>
<activity android:name=".FirstActivity" />
<activity android:name=".SecondActivity" />
<activity android:name=".ThirdActivity" />
</application>
त्यानंतर तीन वेगवेगळ्या activity ची नावे लिहिली आहेत. या activity सुरू करण्यासाठी मुख्य फाईलमध्ये b1,b2,b3 अशी बटन तयार केली आहेत. या तीनही activity त मागे जाण्यासाठी आणखी एक back बटन तयार करावे लागेल.