साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - ३
Category: वेबसाईट डिझाईन
अक्षरसंच
दुसर्या धड्यात आपण अक्षरांविषयी काही टॅग पाहिले. पण अक्षराचा प्रकार बदलला नाही. वेबपेजवर एरियल, टाईम्स न्यू रोमन, वर्दना, ताहोमा यासारखे वेगवेगळे अक्षरसंच (font) वापरता येऊ शकतात. उदा. त्यासाठी फॉंटच्या टॅगचा उपयोग करण्यात येतो.
रंग - वेबपेज वा अक्षरांचा रंग आपल्याला हवा तसा निवडता येतो.रंग red,blue,green,gray अशा विविध नावानी वा अन्य प्रकारे दर्शविता येतात.
चित्र वा फोटो (इमेज)
वेबपेजवर चित्र असले की वेबपेजची शोभा वाढते. वेबपेजवर घालावयाचे चित्र सहसा png, jpg, gif याप्रकारचे व ५० केबीपेक्षा कमी मेमरी लागणारे असावे लागते अन्यथा वेबपेजवर ते चित्र उमटायला वेळ लागतो. फोटोशॉप किंवा फायरवर्क्ससारखे सॉफ्टवेअर वापरून फोटो वा चित्राचा आकार व मेमरी कमी करता येते. चित्र अधिक उटावदार दिसावे यासाठी त्यावर संस्कार करुन मग ते वेबपेजमध्ये वापरले जाते. चित्र घालण्यासाठी img src (image source) हा टॅग वापरावा लागतो व चित्राचे स्थान व नाव द्यावे लागते.
hr ( Horizontal Rule)
hr हा टॅग आडवी रेघ मारण्यासाठी वापरला जातो.
a (Anchor Link)
a हा टॅग html मध्ये सर्वात महत्वाचा आहे. कारण या टॅगचा वापर करून एका पानावरुन दुसर्या पानासाठी लिंक (href) देता येते.
अँकर (a व /a) टॅगचा वापर करून शब्द समूह वा चित्र याना कशी लिंक (href) देता येते. ते खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.
thirdpage.htm
आता नोटपॅडमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे टाईप करून तिसरे पान thirdpage.htm या नावाने सेव्ह करा.