वेबसाईट - टेबल
Category: वेबसाईट डिझाईन
हिशोब लिहिण्यासाठी, बिल करताना, मार्कलिस्ट तयार करताना व अशाच कामासाठी तक्ता किंवा कोष्टक (table) वापरणे सोयीस्कर ठरते.
वेबपेजवर टेबल घालण्यासाठी table व /table हे टॅग वापरले जातात. टेबलची बॉर्डर दिसावयास हवी असेल तर बॉर्डर साठी १,२ वा आवश्यक त्या जाडीसाठी वाढता आकडा लिहिला जातो. मात्र नको असल्यास त्याचे मूल्य ० लिहावे लागते.
प्रत्येक टेबलमध्ये आडव्या ओळी (rows) व उभे रकाने (columns) असतात. टेबलमध्ये पहिल्यांदा आडवी ओळ tr व /tr ने तयार करून जितके रकाने असतील तितक्या वेळा td व /td हे टॅग घालून त्याच्या आत माहिती लिहावी लागते.
वरील टेबलमध्ये प्रत्येक ओळ व रकाना यामुळे जो कप्पा बनतो त्याला cell म्हणतात. टेबल फक्त एका कप्प्याचे असले तरी त्यात एक tr td /td /tr असे टॅग द्यावे लागतात.
टेबलमध्ये सहसा पहिल्या ओळीत रकान्याचे शीर्षक असते. त्यातील माहिती ठळक दिसावी म्हणून पहिल्या ओळीतील रकान्यांसाठी th व /th हे टॅग वापरता येतात.खाली एक टेबलचा प्रोग्रॅम दिला आहे.

