वेबपेजचा टेबल लेआउट
Category: वेबसाईट डिझाईन
कोणतेही वॆबपेज पाहिले तर त्यात बहुतेकवेळा वरच्या बाजूला बॅनर, डाव्या बाजूला मेनूलिंक, उजव्या बाजूस माहिती व अगदी तळाशी वेबसाईट डिझाईनरचे नाव व कॉपीराईट मजकूर असतो. आपल्याला तसा टेबल लेआउट तयार करून वेबपेज तयार करता येईल.
यासाठी एक तीन ओळी व एक रकाना असलेले टेबल करून त्यातील मधल्या कप्प्यात दुसरे, एक ओळ व दोन रकाने असलेले टेबल तयार करायचे.
वेबपेजची रुंदी मॉनिटरच्या स्क्रीनच्या रुंदीवर ठरवावी लागते. ८०० x ६०० आकाराच्या स्क्रीनसाठी साधारणपणे ७७९ पिक्सेल एवढी टेबलची रुंदी ठेवावी. हाय रिझोल्युशनच्या (१०२४ x ६००) मोठ्या स्क्रीन साठी lcd वा लॅपटॉपसाठी १००२ पिक्सेल रुंदी ठेवली जाते. मात्र ग्राहक कोणता मॉनिटर वापरतो हे निश्चित नसल्याने ही रुंदी पिक्सेल ऎवजी परसेंटेजमध्ये ठेवणे अधिक श्रेयस्कर असते.
टेबलची रुंदी १००% ठेवली की स्क्रीनच्या रुंदीप्रमाणे मग ते टेबल कमीजास्त रुंद होते. उंचीला त्याप्रमाने बंधन नसते कारण जास्त माहिती असल्यास वेबपेजवर आपोआप स्क्रोल बार येतो. व तो वापरून आपल्याला वेबपेज खाली वर करता येते.
वरीलप्रमाणे वेबपेज ले आउटचा प्रोग्रॅम खाली दिला आहे.
हे वेबपेज प्रत्यक्षात असे दिसेल.
मोठ्या पूर्ण रुंदीच्या वेबपेजचे उदाहरण प्रत्यक्ष दाखविता येत नसल्याने अशा टेबल लेआउटचा नमुना व त्याप्रमाणे लेआउट असणार्या वेबपेजचे चित्र खाली दिले आहे.
आपणही आता असे आपले स्वतःचे वेबपेज स्वतः फक्त नोतपॅदच्या साहाय्याने बनवू शकाल.