उद्योगवृद्धी व मार्केटींगसाठी वेबसाईट
महाराष्ट्र राज्य उद्योगधंद्यात आघाडीवर असणारे राज्य आहे. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर ही शहरे औद्योगिक शहरे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. मात्र येथील बरेचसे उद्योग मोठ्या उद्योगांना पूरक अशा वस्तूंचे उत्पादन करीत आहेत. त्यामुळे या उद्योगांचा विकास मोठ्या उद्योगांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहतो. एखाद्दुसर्या मॊठ्या उद्योगावर विसंबून न राहता त्यांच्या उत्पादनास जागतिक बाजारपेठ मिळू शकली तर येथील उद्योगांना स्थैर्य मिळेल त्यांचा विकास झपाट्याने होईल. यासाठी गुणवत्ता वाढीबरोबर मार्केटिंगसाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा उद्योगांनी आवर्जून करावयास हवा.
वेबसाईटद्वारा मार्केटींग करण्याचे फायदे आता बर्याच प्रगतिशील उद्योगांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे चांगली डायनॅमिक वेबसाईट डिझाईन करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. उद्योगातील व्यवस्थापन इतर संस्थांच्या मानाने अधिक कार्यक्षम असते. वेबसाईट तयार करताना त्याच्या अपेक्षित उपयोगाबाबत ते जागरूक व आग्रही असतात. जागतिक बाजारपेठेत त्यांच्या उद्योगाचे मुल्यमापन वेबसाइतवरूनच होत असते हे ते जाणतात. यामुळे वेबसाईट डिझाईन करताना उद्योगातील प्रमुख जबाबदार व्यक्ती त्यात विशेष लक्ष घालतात. वेबसाईट अद्ययावत कशी राहील याची ते काळजी घेतात नवनव्या डिझाईनचा ते स्वीकार करतात. साहजिकच वेबसाईट डिझाईन करणार्या संस्थेवर चांगली व उद्योगास उपयुक्त वेबसाईट करण्याची जबाबदारी येऊन पडते. याचा उद्योग व वेबडिझाईन करणारी संस्था दोघांनाही फायदा होतो.
उद्योगवृद्धीसाठी वेबसाईट तयार करताना त्याचे मुख्य उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असते. शेअर होल्डर्ससाठी करावयाच्या वेबसाईटमध्ये आर्थिक स्थैर्यावर भर असावा. तर उत्पादन मार्केटिंगसाठी करावयाच्या वेबसाईटवर उत्पादनाची गुणवत्ता, प्रकार, शॉपिंग कार्ट सुविधा असणे जरूर आहे. उद्योग संस्थापक, प्रगतीचा आढावा, इमारती व यंत्रसामग्रीचे फोटो, गुणवत्ता नियंत्रणासाठी वापरली जाणारी पद्धत, कामगार कल्याण, पर्यावरण व सामाजिक कार्याची माहिती यांचा समावेश असल्यास उद्योगाविषयी जनमानसात चांगली प्रतिमा तयार होते. स्थानदर्शक नकाशा, संपर्क फोन व ग्राहक अभिप्रायाची सोय अशा वेबसाईटवर करणे आवश्यक असते.
सुदैवाने ज्ञानदीपला उगार शुगर वर्क्स व पीसीई इलेक्ट्रोकंट्रोल्स या दोन मोठ्या उद्योगांच्या वेबसाईट डिझाईन करण्याची संधी मिळाली. उद्योग व्यवस्थापनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे व अभ्यासपूर्ण सूचनांमुळे वेबसाईट डिझाईन क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्यास प्रोत्साहन मिळाले व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वेबसाईट तयार केल्यावर त्यांच्याकडून वेबसाईटची नवी कामे मिळाली. खाली उगार शुगर वर्क्सच्या वेबसाईटचे चित्र दाखविले आहे.
तीन वर्षांपूर्वी ही वेबसाईट तयार करताना कोणती रंगसंगती, को्णता फॉंट व कोनते फोटो वापरायचे याविषयी उगार शुगरच्या अधिकार्यांबरोबर अनेक बैठका झाल्या. फ्लॅश एनिमेशन ठरविण्यातही त्यानी महत्वाचे योगदान दिले. ही वेबसाईट झाल्यावर शिपच्या आकाराच्या शुगरक्यूबच्या जागतिक मार्केटिंगसाठी त्यांनी सुचविलेल्या फिल्मीशक्कर या कल्पक नावाची वेबसाईट आम्ही तशाच अभिनव पद्धतीने तयार केली. त्याचे चित्र खाली दिले आहे.
आता त्यांच्यासाठी एका अशाच मार्केटिंग रिसर्चच्या वेबसाईटचे काम आम्ही करीत आहोत.
पीसीई ईलेक्ट्रोकंट्रोल्स या वेबसाईटच्या कामातही आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. त्यानंतर त्यांच्या आणखी तीन वेबसाईटचे काम आम्ही पूर्ण केले. व्हिडिओक्लिप्सचा वापर करून व टेबललेस डीआयव्ही लेआउट करून आम्ही डिझाईन केलेली डेबोनायर इक्विपमेंट्स या उद्योगाच्या वेबसाईटमुळे ज्ञानदीपचे नाव उद्योगजगतात मान्यता पावले. अशाच उद्योगांच्या नाविन्यपूर्ण वेबसाईट करण्याचे काम आमच्याकडे चालून आले.
मात्र अजूनही वरील काही अपवाद वगळता उद्योजक वेबसाईट या प्रभावी माध्यमाचा आपल्या उद्योगवाढीसाठी उपयोग करताना दिसत नाहीत. याचे कारण त्यांना वेबसाईटचे फायदे अजून नीट समजलेले नाहीत असे वाटते. अशा उद्योजकांसाठी एखादी कार्यशाळा आयोजित करण्याचा ज्ञानदीपचा मनोदय आहे.