पीएचपी भाग-६ Form Process
Category: वेबसाईट डिझाईन
पूर्वी आपण युजरकडून अभिप्राय (feedback) घेण्यासाठी फॉर्मचा उपयोग कसा करता येतो हे पाहिले होते. त्यावेळी फॉर्मची माहिती पाठविण्यासाठी पीएचपी प्रोग्रॅमचा वापर करावा लागतो हेही सांगितले होते. आता असा वापर कसा करता येतो हे पाहूया.
समजा आपले कॉम्प्युटर पार्ट चे दुकान आहे व आपल्याला इंटरनेटवरून त्याच्या विक्रीसाठी वेबसाईट करावयाची आहे. html form व पीएचपीच्या साहाय़्य़ाने अशी वेबसाईट आपल्याला करता येईल.
.
यासाठी प्रथम फॉर्म भरण्यासाठी order.html हे वेबपेज करावे. यात मराठी युनिकोड अक्षरे लिहिता यावीत यासाठी मेटा टॅगमध्ये UTF-8 चा उल्लेख केला आहे.खालील प्रोग्रॅम पहा.



