पीएचपी (PHP) प्रोगॅमिंग भाग-१
Category: वेबसाईट डिझाईन
वेबसाईटसाठी पीएचपी (PHP) प्रोगॅमिंग लॅंग्वेजचा वापर कसा केला जातो हे आपण मागच्या धड्यात पाहिले. त्यावेळी आपण फ्क्त पीएचपीच्या साहाय्याने वेबपेजचे भाग एकत्र कसे जोडता येतात हे पाहिले. परंतु पीएचपीविषयी सविस्तर माहिती आपण घेतली नव्हती. पीएचपीचा वापर करून सर्व्हरवरील डाटाबेसच्या साहाय्याने युजरला हवी ती माहिती देण्यासाठी डायनॅमिक वेबसाईट बनविता येते. त्यासाठी पीएचपीची ओळख करून घ्यावयास हवी.
पीएचपी ही मुक्त प्रणाली (Open Source) असून ती सर्व्हरवर स्थापित करावी लागते. सध्या पीएचपी ची 5.2.1 ही आवृत्ती वापरली जाते. पीएचपीमध्ये जावास्क्रिप्टप्रमाणेच व्हेरिएबलचा प्रकार (Integer, string etc) निर्देशित करावा लागत नाही.
पीएचपी कोड हे खाली दाखविल्याप्रमाणे दोन टॅगमध्ये लिहावे लागते. तसेच प्रत्येक ओळीचा शेवट ; या चिन्हाने करावा लागतो. स्क्रीनवर दिसण्यासाठी जावास्क्रिप्टमध्ये जसे document.write वापरतात तसे पीएचपीमध्ये echo ही कमांड वापरावी लागते.
उदाहरणार्थ स्क्रीनवर Hello World हे शब्द उमटण्यासाठी खालील कोड लिहावे लागते.( यातील पॅरेग्राफचा टॅग आवश्यक नाही)

