पीएचपी (PHP) भाग-२

पीएचपी प्रोग्रॅमिंगमध्ये if then, for loop हे जावास्क्रिप्टप्रमाणेच आहेत. त्यामुळे त्याची द्विरुक्ती करीत नाही. पूर्वी आपण जावास्क्रिप्ट वापरून पाढे लिहिण्याचा प्रोग्रॅम लिहिला होता. तो एकदा नजरेखालून घाला. आता याचपद्धतीने एकवीसचे पाढे लिहिण्यासाठी केलेला पीएचपी प्रोग्रॅम पहा. येथे i आणि counter हे दोन व्हेरिएबल वापरून बाहेरच्या लूपमध्ये १ ते १० तर आतल्या लूपमध्ये २१ ते ३० अशा संख्या घातल्या आहेत. टेबलचे सर्व टॅगही echo या कमांडमधून दिले आहेत. स्ताईलमधील कोटेशन चिन्हासाठी \ हे एस्केप चिन्ह घातले आहे. प्रोग्रॅममधील tr व td टॅगच्या लूपमधील जागा नीट समजावून घ्या. याचे उत्तर खालीलपणे येते.