पीएचपी वापरून वेबसाईट डिझाईन
Category: वेबसाईट डिझाईन
वेबसाईट फ्रेम्स या पूर्वीच्या धड्यात आपण फ्रेम्सचा वापर करून वेबसाईट कशाप्रकारे बनविली जायची हे पाहिले. बॅनर, मेनू, तळटीप यासारख्या न बदलणार्या भागांच्या वेगळ्या html फाईल तयार करून फ्रेमद्वारे त्या प्रत्येक पानावरील मजकुराशी जोडल्या जायच्या. मात्र ज्या ब्राउजरला फ्रेम्स दाखविता येत नाहीत त्याच्यासाठी नो फ्रेम्स चा पर्याय ठेवला जायचा. त्यामुळे वेबसाईट योग्यप्रकारे दिसेल याची खात्री देता येत नसे. आता अशा फ्रेम्सच्या ऎवजी ASP, PHP सारख्या प्रोग्रॅमच्या साहाय्याने प्रभावी सुविधा उपलब्ध झाल्याने फ्रेम्सचा वापर फारसा होत नाही.
पीएचपी PHP (PHP Hypertext Preprocessor) ही सर्व्हरवर कार्य करणारी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज आहे. स्टॅटिक html वेबपेज ओळखण्यासाठी नावास जोडून .htm किंवा .html लिहिले जाते तर पीएचपी लॅंग्वेज असणार्या वेबपेजच्या नावास .php असा जोड दिलेला असतो. उदाहरणार्थ aboutus.php. पीएचपी प्रोग्रॅम हा html वेबपेजमध्येच