शोधयंत्रास सुयोग्य (SEO) वेबसाईट भाग - ३
Category: वेबसाईट डिझाईन
शोधयंत्राचा प्राधान्यक्रम(Ranking Factors)
शोधयंत्राद्वारे प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करण्यात येतो.
एक पद्धत म्हणजे विशिष्ट पानातील मजकुराच्या आधारे (On page rank-ऑन पेज रॅंक) प्राधान्यक्रम लावणे व दुसरी पद्धत म्हणजे बाह्यघटकांच्या आधारे(Off page rank-ऑफ पेज रॅंक) प्राधान्यक्रम लावणे.
On page rank
ऑन पेज रॅंकसाठी खालील गोष्टींचा विचार करावा.
१. Title वेबपेजचे शीर्षक सुटसुटीत व अर्थवाही असावे. यात १० ते १२ शब्दांपेक्षा जास्त शब्द असू नयेत. त्यात विनाकारण कीवर्ड घालू नये. वेबसाईटमधील प्रत्येक पानाचे शीर्षक वेगळे असावे व त्यातून त्या वेबपेजवरील मजकुराचा अंदाज यावा.
२. Content वेबपेजवरील मजकूर -
शोधयंत्राच्या दृष्टीने याला सर्वात जास्त महत्व असते.
Content is the king असे म्हटले जाते ते शोधयंत्रासही लागू पडते.
मात्र हा मजकूर शोधयंत्रासाठी म्हणून न लिहिता वाचकांना सहज समजेल अशा भाषेत व उपयुक्त वाटेल अशा प्रकारचा असावा.
विषयाची वा वस्तूची केवळ रुक्ष माहिती न लिहिता वैशिष्ठ्ये, आपले वा इतरांचे अनुभव, संदर्भ आणि अभिप्राय यांचा समावेश करून ती आकर्षक व परिपूर्ण करावी.
वरील माहिती शोधयंत्रास कितपत उपयुक्त ठरेल अशी शंका येणे स्वाभाविक आहे.
मात्र वरीलप्रकारे माहिती लिहिल्यास एका पानावर एकाच विषयाची माहिती (one page, one theme) येते व ते वेबसाईटच्या मांडणीत व शोधयंत्रास long tail keywords वापरून प्राधान्यक्रम ठरविताना अधिक उपयुक्त ठरते.
३. नेव्हीगेशन ( आतील पानांच्या लिंक्स )
साध्या टेक्स्टमध्ये दिलेल्या मेनूच्या लिंक शोधयंत्राच्या व वाचकाच्या दृष्टीने फ्लॅश वा जावास्क्रिप्ट वापरून केलेल्या मेनू लिंकपेक्षा अधिक उपयुक्त ठरतात.
दुसरा पर्याय म्हणजे सर्व पानांवर साईटमॅप ठेवून एका क्लिकने पाहिजे त्या पानाकडे जाण्याची सोय ठेवल्यास वेबपेजच्या अंतर्गत लिंकची संख्या वाढते व शोधयंत्राद्वारे वेबपेजेसचा प्राधान्यक्रम वर येतो.