जावास्क्रिप्ट - String Object

string म्हणजे अक्षरसंच. उदा. "Welcome to Dnyandeep Foundation" किंवा "1234" याठिकाणी "1234" व 1234 यात फरक आहे हे लक्षात घेतले पाहिजे, "1234" हा अक्षरसंच आहे तर 1234 ही संख्या आहे. String Object चे गुणविशेष व पद्धती यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत. string.toUppercase() कॅपिटल अक्षरे करणे string.indexOf() विशिष्ट अक्षराचा क्रमांक दाखविणे. क्रमांक 0 पासून सुरू होतात. string.lastIndexOf() विशिष्ट अक्षराचा शेवटचा क्रमांक दाखविणे.

String मधील शब्द शोधण्यासाठी वा बदलण्यासाठी खालीलप्रमाणे प्रोग्रॅम करता येतो.
String मधील शब्द वेगवेगळे करून array मध्ये दर्शविता येतात.खालील उदाहरण पहा var str="Visit Dnyandeep Infotech"; var splitResult = str.split(" "); for(i = 0; i < splitResult.length; i++){ document.write("
Element " + i + " = " + splitResult[i]); } याचे उत्तर Element 0 = Visit Element 1 = Dnyandeep Element 2 = Infotech असे येईल.