पीएचपी भाग-४ Strings
Category: वेबसाईट डिझाईन
पीएचपी Strings
string म्हणजे अक्षरसंच वा समूह. एका अक्षरापासून ते अनेक शब्दांचा समूह वा ओळी string प्रकारच्या व्हेरिएबलमध्ये साठविता येतात. हा एक array च असतो. या string व्हेरिएबलमध्ये बदल करण्यासाठी तसेच त्यातील अक्षरे वा अक्षरसमूहांवर संस्कार करण्यासाठी पीएचपीमध्ये काही सुविधा आहेत.
$name="Dnyandeep Foundation";
यातील सर्व अक्षरे कॅपिटल करण्यासाठी strtoupper($name) तर सर्व अक्षरे दुसर्या लिपीतील करण्यासाठी strtolower($name) ही फंक्शन वापरता येतात.
ucwords("webdesign course") यामध्ये पहिले अक्षर कॅपिटल केले जाते यालाच Title case असे म्हणतात.
string मधील काही अक्षरे वा शब्द बदलावयाची असल्यास खालील फंक्शन वापरता येते.
str_replace(search, replace, String) यात search म्हणजे जुना ( string मध्ये असलेला) अक्षरसमूह, replace म्हणजे नवा अक्षर समूह आणि String म्हणजे मूळ अक्षर समूह.
strpos($name, "p") या फंक्शनचा अर्थ $name या अक्षरसमुहातील p चे स्थान.यात पहिल्या अक्षराचे स्थान 0 असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
वरील string functionsचा उपयोग खालील प्रोग्रॅममध्ये दाखविला आहे.
याचे उत्तर खालीलप्रमाणे येते.
-----------------------------------------------
Dnyandeep Infotech Pvt. Ltd.
Converted to capital letters - DNYANDEEP INFOTECH PVT. LTD.
Converted to lower letters - dnyandeep infotech pvt. ltd.
Converted to Title Case - Webdesign Course
Original name - Dnyandeep Infotech Pvt. Ltd.
New name - Dnyandeep Foundation
Location of 'p' in Dnyandeep Infotech Pvt. Ltd. - 8
---------------------------------------------------------------------