वेबसाईट स्टाईलशीट
Category: वेबसाईट डिझाईन
आपण वेबपेजमधील टॅगना गुणविशेष (attributes) कसे द्यायचे ते पाहिले. html 4 या html च्या सुधारित आवृत्तीप्रमाणे हेच गुणविशेष आता स्टाईल (style) या एकाच पद्धतीने दिले जातात. उदाहरणार्थbody style="background-color:yellow"
h2 style="text-align:center"
p style="font-family:courier new; color:blue; font-size:20px"
भविष्यकाळात attributes चा वापर न करता स्टाईल पद्धतच वापरावी लागणार आहे. html प्रोग्रॅममध्ये टॅगबरोबर attributes दिले तर प्रोग्रॅम वाचण्यात अडचण येते. तसेच त्याचप्रकारचे अनेक टॅग असले तर प्रत्येक ठिकाणी असे attributes द्यावे लागतात. यावर उपाय म्हणून स्टाईल हेड(head) टॅगमध्येच लिहून ठेवायची व body टॅगमध्ये attributes न देता केवळ साधॆ टॅग वापरायचे अशी सुधारणा करण्यात आली. त्याचे उदाहरण खाली दिले आहे.

