वेबसाईट टेबल टॅग्स
Category: वेबसाईट डिझाईन
वेबपेजवर टेबलचा वापर करून माहिती वा चित्रे घातली तर ती व्यवस्थित दिसण्यासाठी टेबलमधील attributesचा योग्य वापर करणे आवश्यक असते. टेबलमधील प्रत्येक आडवी ऒळ(tr) व उभा रकाना (td) यामुळे जो कप्पा किंवा सेल (cell) तयार होतो त्यासाठी cellpadding व cellspacing हे दोन महत्वाचे attributes आहेत.cellpadding हे सेलच्या आतल्या बाजूस मजकूर वा चित्राच्या भोवताली ठेवायची मोकळी जागा दर्शविते. तर cellspacing हे टेबल व सेल किंवा दोन सेलमधील मोकळी जागा दर्शविते. खालील उदाहरणात ४०० पिक्सेल रुंदीचे व २ पिक्सेल जाडीच्या बॉर्डरचे टेबल करण्यासाठी खालील कोड वापरले आहे. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)table width="400" border="2" cellpadding="10" cellspacing="20" bgcolor="#003366"
येथे cellspacing वेगळे कळण्यासाठी table या टॅगला निळा रंग bgcolor="#003366" दिला आहे. cellpadding वेगळे कळण्यासाठी tr व td साठी तपकिरी रंग (bgcolor="#993300") वापरला आहे व या सेलमध्ये वेबसाईटचे छोटे चित्र दाखविण्यासाठी खालीलप्रमाणे img टॅगला attributes दिले आहेत. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)
img src="/debonair.jpg" width="150" height="100" alt="Debonair equipments" longdesc="http://www.debonairequipments.com"
खालील वेबपेजवरून आपल्याला सेल पॅडींग ( तपकिरी १० पिक्सेल रुंदी) व सेल स्पेसिंग (निळे २० पिक्सेल रुंदी) यातील फरक समजून येईल.
