गीता फाऊंडेशन
गीता फाऊंडेशन संस्थेची व कार्याची माहिती.
गीता फाऊंडेशन
॥ यतन्तःश्च दृढव्रताः ॥
चैतन्य, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड, मिरज
फोन - २२३२०८२, २२३११८२, ९८६००३२८२
Email- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
१) संस्थेचे प्रमुख उद्देश : - अ) गीता - भागवतातील आचरणशास्त्राचा प्रचार व प्रसार.
आ) मुलांवर संस्कार करणे व त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम राबविणे.
इ) उच्च शिक्षण पूर्ण करण्यास गरजू व होतकरू मुलांना शिष्यवृत्ती देणे.
ई) धर्मयज्ञ मासिक प्रकाशन - केवळ अध्यात्म विषयक मासिक.
उ) शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पत्रद्वारे जपानी भाषा’ शिकविण्याचे वर्ग.
ऊ) गीता पाठांतर परीक्षांचे आयोजन.
क) सर्व आध्यात्मिक ग्रंथ - अर्थ व पठणासहितची ‘गीता फाऊंडेशन’ वेबसाईट.
२) जीवनात जगण्याचे एक शास्त्र आहे. ते सोडून जो मनाला येईल तसे वागतो त्याला यश व समाधान प्राप्त होणार नाही असे प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेत म्हटले आहे (१६.२३). त्यामुळे गीता - भागवतात कोणती शिकवण आहे त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात गीता फाऊंडेशनची काही प्रकाशने आहेत त्याद्वारा व प्रवचन, व्याख्यानद्वारा प्रचार/प्रसार करणे.
३) शालेय मुलांनी वाचावीत अशा भरपूर पुस्तकांवर प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. पुस्तक वाचून/पुस्तकात बघून घरच्यांची मदत घेऊन त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. ६ पुस्तके वाचून त्यावरील प्रश्नपत्रिका सोडविणार्या मुलास एक प्रमाणपत्र दिले जाईल. ही ‘लेखन - वाचन अभियान’ योजना शाळा आणि वैयक्तिक पुढाकाराने ८/१० च्या गटाने कार्यान्वित आहे.
४) संस्थेतर्फे सध्या सुमारे ४० मुले उच्च शिक्षण घेत असून त्यांना कर्जरूपाने शिष्यवृत्ती दिली जाते. त्या मुलांवर संस्कार केले जातात. वर्षाचा शिक्षणावरचा सध्याचा खर्च अंदाजे रु. ३ लाख.
५) केवळ अध्यात्म या विषयाला वाहिलेले, कोणतीही जाहिरात नसलेले, कथा - कविता - भविष्य सदर नसलेले ‘धर्मयज्ञ’ नावाचे मासिक गेली तीन वर्षे चालू आहे. गीता - भागवत - उपनिषदे - रामायण - ब्रह्मसूत्रे - ज्ञानेश्वरी - गुरुचरित्र इ. लेखमाला सध्या चालू आहेत. पंचदशी - ऋग्वेद यावर लेखमाला सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मासिकाची वार्षिक वर्गणी रु. २५०/- असून मासिकापासून मिळणार्या सर्व उत्पन्नाचा विनियोग केवळ शिक्षण कार्यासाठीच होतो आणि दर तिमाहीस पूर्ण जमाखर्च सर्वांपुढे प्रस्तुत केला जातो.
६) ‘पत्रद्वारे जपानी भाषा’ वर्ग चालू आहे. प्रत्येक महिन्याला घरी सरावासाठी एक अभ्यासक्रम दिला जातो. भरपूर सराव करून ५ महिन्याचे ५ अभ्यासक्रम घरी बसून पूर्ण केल्यावर ६ महिन्यात (घरातच सोडविण्याची) परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिले जाते. सध्याच्या काळात एक तरी परदेशी भाषा येणे आवश्यक झाले आहे. ५ महिन्याच्या अभ्यासक्रमाचा एकूण खर्च रु. २५०/-. पुढील अभ्यासक्रमाची नोंदणी जून २००९ मध्ये.
७) गीता पाठांतर परीक्षा - ही योजना प. पू. शंकराचार्य शृंगेरी (शारदापीठ) यांचे आशीर्वाद प्रेरणेने राबविली जाते.