जोडाक्षरविरहित शब्द
- कानामात्रा नसलेले शब्द अ- अहमद, बदक, गरम, मलम,कमळ, गजर, मन, नगर, करमरकर, नमन, वरण, पटकन, चटकन, तरट, गवत, धनगर, गणपत, दगड, वजन, फळ,
- काना असणारे शब्द - आ - आत, वारा, गारा, दात, भात, थाट, वाट, वाटाणा, काका, दादा, मामा, नाना, भारा,
- वेलांटी असणारे शब्द - इ ई - इमारत, गिरणी. खिडकी, विहीर, डीडीटी, तिकीट, किती, फी, हिरडी, पिशवी, हिरवी, विडी,
- उकार असणारे शब्द - उ -उघड, मुलगा, दुकान,सुख, कुमार,
- ऊकार असणारे शब्द -ऊन, मूल, चूल, दूर, पूल, फूल,
- एकार असणारे शब्द - एक, ते, ने, हे, आहे, भेट, वेडा, केवडा, खेकडा, डेरा,
- दोन मात्रा असणारे शब्द ऎ - ऎट, कैरी, वैरी, कैदी, भैरवी, हैदराबाद, कैद, वैभव, दैव, मैना
- एक काना एक मात्रा असणारे शब्द -ओ - ओठ, कोट, झोप, बोट, खोड, मोर
- एक काना दोन मात्रा असणारे शब्द -औ - औत, मौज, गौर, कौल, हौद, डौलदार
- अनुस्वार असणारे शब्द अं - अंध, मंद, गंध, वंदन, खंत, संत,