वर्तुळ व लंबवर्तुळ

वर्तुळ
एका बिंदूपासून समान अंतरावर असणार्‍या व एकाच प्रतलावर (Plane) असणार्‍या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
त्रिज्या
वर्तुळाचा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणार्‍या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे
व्यास
वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणार्‍या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणार्‍या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
r = त्रिज्या d = व्यास , c = परिघ , A = क्षेत्रफळ

ज्या
वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुस जोडणार्‍या सरळ रेषेस ज्या किंवा जिवा म्हटले जाते. एखाद्या वर्तुळात समान किंवा असमान लांबीच्या असंख्य ज्या काढता येतात. व्यास, वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे.

लंबवर्तुळ
लंबवर्तुळ म्हणजे भूमितीमध्ये एकाच प्रतलावर (plane) मध्ये असणार्‍या अशा बिंदूंचा संच ज्यांचे दोन स्थिर बिंदूंपासूनचे अंतर हे समान असते.अर्धदीर्घ अक्ष हा भूमितीमध्ये लंबवर्तुळाचा गुणधर्म आहे. हा लंबवर्तुळाच्या सर्वात मोठ्या व्यासाचा अर्धा भाग आहे.