क्षार जमिनींची समस्या
भारतात कमीत कमी १.२ कोटी एकर (४१ लाख हेक्टर) जमीन क्षार अगर खारवटपणामुळे कमी उत्पादन देते. मुख्यत्वे करून पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, हरिायाना, राजस्थान आणि महाराष्ट्न् या राज्यामध्ये क्षारयुक्त जमिनींची समस्या वाढत चालली आहे. सध्या महाराष्ट्नत क्षार जमिनींचे क्षेत्र २० लाख हेक्टरपेक्षा अधिक झाले आहे.
जमीनीत ४ प्रमुख घटक आहेत. माती ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा पाणी मिळून २५ टक्के अशी जमीन चांगली असते. योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा भरपूर उपयोग पिकांची फेरपालट, पाण्याचे नियंत्रण यामुळे वरील घटकांचे प्रमाण योग्य रहाते. पीक व्यवस्थनापेक्षाही जमिन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
जमिनीचा सामू हे मातीची अम्लता व अल्कता दाखविणारे माप आहे. सामू ६.५ ते ८ असेल तर योग्य मानले जाते. अशा जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असतात व पिकांची वाढ चांगली वाढ चांगली होते. सामू जर ६.५ पेक्षा खाली अगर ८ पेक्षा जास्त असल्यास पिकांच्या वाढीवर त्या त्या प्रमाणात परिणाम होतो. हे प्रमाण वाढल्यास क्षारांचे प्रमाण वाढते. व जमिन घट्ट होते त्यामुळे पाणी पृष्ठभागावरती साचून राहते त्यामुळे सोडियमचे प्रमाण वाढते व जमिनीची घडण बिघडते. अशा खारवट जमिनीत बियांची उगवण चांगल्या प्रमाणात होत नाही. जमिनीतील अन्न द्रव्यांची उपलब्धता कमी होते. व पिकांची वाढ खुंटते.
सर्व पिके जमिनीत ५० टक्के उपलब्ध पाणी असेल तेव्हाच जोमाने वाढतात तरी सुध्दा मोकाट अगर भरमसाट पाणी दिले जाते. त्यामुळे जमिनीच्या तळावर साठलेले क्षार जमिनीवर येऊन साचते. व जमिन खारवट होते. जेथे सामू (पी. एच.) चे प्रमाण ९ चे वर गेले आहे. अशा ठिकाणी काही वर्षात कोणतीच पिके घेता येणार नाहीत.
खारवट व चोपण जमिनी सुधारण्याचे उपाय :-
१. फेरपालटीकरिता योग्य अशी पिके घ्यावीत त्यात क्षार शोषणारी बीट अगर ढेंच्या सारख्या पिकांचा समावेश करावा.
२. जमिनीच्या पृष्ठभागावर जर क्षाराचा थर असेल तो फावड्याने खरडून बाहेर टाकावा, क्षार जमिनीत क्लोराईड यूक्त खते घालू नयेत.
३. पाण्याच्या निचरा चांगला होत असल्यास प्रत्येक १०० ते १५० फुटावर खोलवर खणून गोड्यापाण्याने क्षार धुवुन बाहेर काढावेत.
४. जमिनीतील माती परिक्षण करून प्रति हेक्टरी ५-६ टन जिप्सम् जमिनीत सारख्या प्रमाणात मिसळावे. त्यानंतर भरपूर पाणी द्यावे. यामुळे जमिनीचा सामू कमी होतो व सोडियमचे प्रमाणही कमी होवून जमिनीची पोत सुधारते.