शास्त्रीय कारणे द्या. भाग - १
१ विजेच्या तारांवर चिमणी बसल्यास काही होत नाही, मात्र वटवाघूळ बसल्यास ते मरते.
२ साधे अंडे गोल फिरविले तर नीट फिरत नाही,मात्र उकडलेले अंडे नीट फिरते.
३ आइसक्रीम करताना भोवताली खारे पाणी वापरतात.
४ बारीक व्यासाची नळी पाण्यात बुडविली तर नळीत पाणी वर चढते.
५ पाण्यातील रंग, वास काढण्यासाठी सक्रीयीकृत कोळसा वापरतात.
६ पृथ्वीवरून पाहताना आकाशाचा रंग निळा असतो, मात्र पृथ्वीपासून दूर गेल्यास आकाश काळे दिसते.
७ उन्हाळयात पांढरे तर हिवाळयात काळे कपडे वापरावेत.
८ बेदाणा पाण्यात टाकल्यास फुगतो मात्र द्राक्ष साखरेच्या पाकात टाकले तर आकसते.
९ भट्टीजवळ काम करणाऱ्यांना मिठाचे पाणी प्यायल्यास बरे वाटते.
१० ग्रहांचा प्रकाश स्थिर असतो पण तारे लुकलुकतात.