भास्कराचार्य - नववी जन्म शताब्दी समारोह

भारताचे प्रसिध्द प्राचीन गणितज्ञ भास्कराचार्य यांची नववी जन्म शताब्दी येत्या २०१४ या नवीन वर्षात साजरी होत आहे. या निमित्ताने मराठी विज्ञान प्रबोधिनी सांगली, कौशलम्‌ न्यास पुणे व ज्ञानदीप एज्युकेशन व रिसर्च फौंडेशन, सांगली यांच्यातर्फे विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व येरळा प्रकल्प, सांगली याच्या सहकार्याने गणित या विषयावर निरनिराळे उपक्रम (व्याख्याने व भास्कराच्यार्याचे गणिता वर स्पर्धाचे) आयोजन करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाची सुरवात करत असताना प्रथम दि. २८-१२-२०१३ रोजी प्रा. मोहन आपटे सर, खगोल व गणितज्ञ, मुंबई यांना पाचारण करुन सांगली जिल्ह्यातील १५० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विलिंग्डन महाविद्यालय येथील वेलणकर हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी १४२ माध्य. व उच्च माध्य. शिक्षकांचा प्रत्यक्ष समावेश होता. ही कार्यशाळा दिवसभर होती. प्रा. आपटे यांनी भास्कराचार्याचे गणित व खगोलशास्त्र यावरील संशोधन व त्यांचा जीवन पट ह्या संबधीची माहिती स्लॅईड शो च्या सहाय्याने सकाळी १२ ते दुपारी ५ वाजेपर्यत दिली.
या प्रशिक्षित शिक्षकांमार्फत भास्कराचार्याचे हे संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 


या कार्यशाळेचे उद्‌घाटन माजी वनाधिकारी व मराठी विज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. तानाजीराव मोरे याच्या शुभ हस्ते झाले. या वेळी प्रा. डॉ. उदय नाईक, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांनी प्रास्ताविक करत असताना या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. डॉ. एस्‌. व्ही. रानडे यानी श्री. मोहन आपटे सर व श्री. तानाजीराव मोरे यांचा परिचय करुन दिला. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह श्री. अरविंद यादव यांनी या कार्यशाळेचे नियोजन यशस्वी पणे केले.

श्री. मधुकरराव यादव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. सांगली व श्री. अंबी विस्तार अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य करुन १५० शिक्षकांना या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

तसेच भास्कराचार्याचे गणित या विषयावर स्पर्धा परिक्षाचे आयोजन २०१४ सालात वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत. या मध्ये दोन गट असणार आहेत १) सर्वासाठी २) विद्यार्थासाठी. या संबधिचा संपूर्ण अहवाल लवकरच प्रसिध्दीस देण्यात येणार आहे. सौ. लीना मेहंदळे, माजी जिल्हाधिकारी, सांगली व कौशलम्‌ न्यास, पुणे यांचे संपूर्ण सहकार्य या स्पर्धांसाठी लाभणार आहे.