वैदिक गणित ( भाग पहिला : गुणाकार) वर्ग

वापरावयाचे सूत्र - ऊर्ध्वतिर्यक् ।
उदा ४३ चा वर्ग करा.
पायरी एक : एकम्‌ स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा . ३ चा वर्ग= ९
पायरी दोन : आता एकम्‌ आणि दशम्‌ स्थानचे अंक घ्या. त्यांच्या गुणाकाराची दुप्पट करा ३x४x२=२४
यात २४ पैकी ४ हे ९च्या एक घर डावीकडे व आनी २ हे हातचे म्हणून ४च्या एक घर डावीकडे व खाली मांडा.
पायरी तीन : आता ३ सोडून द्यायचे म्हणजे उरले ४. त्याचा वर्ग करायचा तो आला १६. यातील ६ हे ४ च्या डावीकडे व १ हातचा म्हणून एकघर डावीकडे व खाली मांडा.
पायरी चार : आता सर्व अंकांची बेरीज करा.
४३ चा वर्ग =
६ ४ ९
१ २
---------
१ ८ ४ ९ हे उत्तर.

६७ चा वर्ग =
६ ४ ९
३ ८ ४
---------
४ ४ ८ ९ हे उत्तर.

खालील संख्यांचा वर्ग करा
(१) ८३ (२) ९६

तीन अंकी संख्यांचा वर्ग
उदा. २३५ चा वर्ग
पायरी १ - नेहमीप्रमाणे आधी ५ चा वर्ग = २५
पायरी २ - आता शेवटचे दोन अंक घ्यायचे. जेव्हा दोन अम्क असतील तेव्हा त्यांच्या गुणाकाराची दुप्पट करायची
म्हणजे येथे ५x३x२=३०
पायरी ३ - आता तिन्ही अंकांचा विचार करायचा आहे. तिसर्‍या आणि पहिल्या अंकांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक मधल्याचा वर्ग
२x५x२ + ३x३=२० + ९=२९
पायरी ४ - आता एकम्‌ स्थानचा अंक सोडून द्यावा. उरलेल्या दोन अंकांच्या गुणाकाराची दुप्पत करा
२x३x२=१२
पायरी ५ - आता दशम्‌ स्थानचा अंक सोडून द्यावा. उरले २ म्हणून त्याचा वर्ग = ४
२३५ चा वर्ग
४२९०५
१२३२
------
५५२२५
वरील गणित ऊर्ध्वतिर्यक्‌ पद्धतीनेही सोडविता येते यावेळी २३५ चा वर्ग म्हणजे २३५ x२३५ करावयाचे.
६२५ चा वर्ग
६४४०५
३२६२२
---------
३९०६२५
२७३ चा वर्ग करा
१५६ चा वर्ग करा
५३८ चा वर्ग करा

पाच अंकी संख्येचा वर्ग
उदा.
२५४३६ चा वर्ग
= ४०१२०४७६६
२४५७८५३३
-----------------
६४६९९००९६
(१) २७५६५ चा वर्ग करा
(२)७३८९ चा वर्ग करा.