गणित, विज्ञान व वाचनात भारतीय विद्यार्थी पिछाडीवर !

(लोकमत १६-१-२०१२)
नवी दिल्ली - राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अमेरिकन तरुणांना भारतीयांच्या प्रतिभेचे कितीही भय दाखवोत; पण प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धांंच्या निकालाने भारतीय विद्यार्थ्यांंच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या स्पधार्ंंत एकूण ७३ देशांच्या विद्याथ्यार्ंत भारतीय विद्यार्थी ७२ व्या क्रमांकापर्यंंत मागे फेकले गेले आहेत. याउलट या स्पर्धांंत प्रथमच भाग घेतलेल्या चीनी विद्यार्थ्यांंनी मात्र सर्व स्तरांवर आपल्या यशाची पताका फडकावली आहे.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांंच्या या अपयशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयही प्रचंड निराश झाले आहे. मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षा, संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) यासंदर्भात चौकशी करण्यास सांगितले आहे.
आर्थिक सहकार्य व विकास संघटनेकडून (ओईसीडी) दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम (पिसा) आयोजित केला जातो. याअंतर्गत विविध स्पर्धांंंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंची गणित, विज्ञान व अवांतर वाचनाची क्षमता तपासली गेली जाते. यावर्षी या स्पर्धांंंमध्ये ७३ देशांनी भाग घेतला होता. भारताच्या १५ विद्यार्थ्यांंंच्या गटाने यात भाग घेतला होता. ओईसीडीच्या निकालानुसार, भारतीय विद्यार्थी या स्पर्धेत ७२ व्या क्रमांकावर राहिले. केंद्र सरकारने तामिळनाडू व हिमाचल प्रदेशातील बुद्धिवान विद्यार्थ्यांंंना या स्पर्धेसाठी निवडले होते.; मात्र गणित, विज्ञानात या सर्वांंंनी निराशा केली.
डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा निकाल
दरम्यान शिक्षणतज्ज्ञांनी या निकालानंतर परखड प्रतिक्रिया दिली आहे. हे निकाल आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहेत. या निकालानंतर भारतीय शिक्षणाचा स्तर तपासण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.