मोठ्याने वाचण्याचा जागतिक दिवस ९ मार्च

९ मार्च हा दिवस जागतिक मोठ्याने वाचण्याचा दिवस ( World_Read_Aloud_Day_set_for_March_9 Ref - http://www.reading.org )म्हणुन साजरा करण्यात येतो.

लिटवर्ल्ड या अमेरिकेतील संस्थेने सार्वत्रिक शिक्षणाच्या प्रसारासाठी हा उपक्रम सुरू केला असून अमेरिकेसह ४० देशात हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. इंटरनेटवरील फेसबुक व इतर वेबसाईट्सवर यासाठी विषेष व्यवस्था करण्यात आली आहे.यावर्षी जगातील ७७४ दशलक्ष लोकांसाठी ७७४ मिनिटे मोठ्याने वाचण्याचा विक्रम करण्याचे उद्दीष्ट संस्थेने ठेवले आहे. यासाठी शिक्षक, ग्रंथपाल यांनी किमान १० मिनिटे मुलांकडून मोठ्याने वाचून घ्यावे असे आवाहन संस्थेने केले आहे.

भारतात पाठांतर व मोठ्याने वाचणे (सामुदायिक पारायण) या गोष्टींना नेहमीच महत्वाचे स्थान दिले जाते. आता जगभर हा संदेश पोहोचविण्याचे कार्य या दिवसाने होणार आहे.