शिकविणे आणि शिकणे भाग - १

शिकविणे आणि शिकणे ही पुष्कळशा अनियमिततांचा/परिवर्तनीयतांचा समावेश असलेली प्रणाली असते. शिक्षणार्थी आपल्या लक्ष्याकडे पोचण्यासाठी कार्य करीत असतांना आणि नवे ज्ञान, पध्दती, आणि त्यांच्या शिकण्याविषयीच्या अनुभवांमध्ये वाढ करणार्या कौशल्यांचे संवर्धन करीत असतांना ह्या अनियमितता परस्पर क्रिया करतात.

गेल्या शतकापासून, शिकण्यासंबंधी किंवा ज्ञानार्जनाबाबत विविध दृष्टिकोनांचा उदय झाला आहे, त्यांच्यातील – संज्ञानात्मक (एक मानसिक कार्य म्हणून शिकणे); आणि कार्यप्रवर्तक (ज्ञानार्जन प्रणालीच्या परिणामापासून एक निर्मित तत्त्व म्हणून असलेले ज्ञान). ह्या पध्दतींचा वेगवेगळा विचार करण्यापेक्षा, ज्ञानार्जनाच्या अनुभवांमध्ये एकत्रित केल्या जाऊ शकणार्या शक्यतांचा टप्पा म्हणून यांचा संयुक्तपणे विचार केला जाणे उत्तम ठरेल. ह्या संयुक्तता प्रणालीच्या दरम्यान, पुष्कळशा इतर घटकांकडे ही लक्ष पुरवायला हवे- संज्ञानात्मक पध्दत, शिकण्याची पध्दत, आपल्या कौशल्यांचे बहुविध स्वरूप, आणि विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या आणि ज्यांच्या गरजा विशिष्ट प्रकारच्या आहेत अशा लोकांसाठी ज्ञानार्जन.