शिकविणे आणि शिकणे भाग - २

कार्यप्रवर्तक सिध्दांत

(जे.ब्रूनर)
कार्यप्रवर्तकता विद्यार्थ्यांचे विद्यमान ज्ञान, विश्वास आणि कौशल्ये प्रकट करणारी ज्ञानार्जन नीती आहे. ह्या कार्यप्रवर्तक पध्दतीने, विद्यार्थी आधीचे ज्ञान व नवीन माहिती यांचे नवीन मिश्रण तयार करतात.

एक कार्यप्रवर्तक शिक्षक सर्व समस्यांवर उपाय करतो आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे निरीक्षण करतो, विद्यार्थ्यांच्या शंकांचे मार्गदर्शन करतो आणि विचारांच्या नव्या पध्दतींना प्रोत्साहन देतो. नवीन डाटा/विवरण, प्राथमिक स्त्रोत, आणि परस्पर क्रियात्मक सामग्री यांच्यासह कार्य करणारे कार्यप्रवर्तक शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या डाटाप्रमाणे काम करावयास लावते आणि त्यांच्या स्वत:च्या संशोधनांना दिशा देण्यास मदत करते. अर्थातच, विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे विशाल, विस्तृत ज्ञानार्जन आहेसे वाटू लागते. प्रौढांसह, सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कार्यप्रवर्तक पध्दतीचा चांगला उपयोग होतो.

पुनरावलोकन

ज्ञानार्जन किंवा शिकणे ही एक सक्रिय प्रणाली आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्याच्या स्वत:च्या पूर्वीच्या/सद्यस्थितील माहितीवर आधारित असलेल्या नवीन कल्पनांची रचना करतो ही ब्रूनरच्या सैध्दान्तिक संरचनेची मुख्य कल्पना आहे. विद्यार्थी संज्ञानात्मक संरचनेच्या आधारे माहिती निवडून तिचे रूपांतर करतो, कल्पनेची रचना करतो, आणि निर्णय घेतो. कार्यप्रवर्तक संरचना (जसे रूपरेषा, मानसिक प्रारूप) अनुभवांना अर्थ आणि संस्था प्रदान करते व व्यक्तीला ‘दिलेल्या माहितीच्या ही पुढे जाण्याची’ अनुमति देते.
निर्देशांचा संबंध विचारांत घेता, प्रशिक्षकाने विद्यार्थ्यांना सिध्दांतांचा शोध स्वत:च लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रशिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक सक्रिय संवाद असावा (जसे सॉक्रेटिक लर्निंग). विद्यार्थ्यांच्या सध्याच्या समजून घेण्याच्या स्थितीप्रमाणे उपयुक्त ठरेल अशा प्रकारे माहितीचे भाषांतर करणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे करण्यात आली पाहिजे की विद्यार्थी निरंतर त्यामध्ये आणखी भर घालत राहतील.

ब्रूनर (1966) च्या म्हणण्याप्रमाणे माहितीची कल्पनेने खालील चार मुख्य पक्षांना संबोधित करावे:
1. शिक्षणाबाबत आगाऊ कल
2. ज्ञानाच्या स्वरूपाची अशी संरचना करणे ज्यायोगे विद्यार्थ्याद्वारे ते आत्मसात करणे सुलभ ठरेल.
3. वर्तमान सामग्री जास्त प्रभावी रुपात सादर करणे, आणि
4. पुरस्कार व शिक्षा यांचे स्वरूप निश्चित करणे.

माहितीच्या कुशल हाताळणीत वाढ करण्यासाठी, नवीन संकल्पनांची निर्मिती व सरलीकरण करण्यासाठी ज्ञानाच्या रचनेकरीता चांगल्या पध्दती.

त्याच्या अलिकडील कार्यांमध्ये, ब्रूनर (1986, 1990, 1996) ह्याने त्याच्या ज्ञानार्जनाच्या सांस्कृतिक व सामाजिक पक्षांना घेरण्यासाठी तसेच कायद्याच्या अभ्यासाकरीता त्याच्या सैध्दांतिक संरचनेचा विस्तार केला आहे.