शिकविणे आणि शिकणे भाग - ३

संधी/लागूकरण

ब्रूनरच्या कार्यप्रवर्तक सिध्दांताची संकल्पना ही आकलनीय/संज्ञानात्मक अभ्यासावर आधारित माहितीसाठी असलेली एक सामान्य संरचना आहे. त्यातील बहुतांशी भाग बाल विकास संशोधनाशी (विशेषत: पायगेट) निगडीत आहे. ब्रूनर (1960) मधील कल्पना विज्ञान व गणित शिकण्यासंबंधी असलेल्या एका बैठकीवरून घेण्यात आल्या आहेत. ब्रूनरने किशोरवयीन मुलांसाठी गणित व सामाजिक ज्ञान कार्यक्रमाच्या संदर्भात त्याच्या सिध्दांताच्या विस्ताराचे स्पष्टीकरण केले. ब्रूनर, गुडनाव एण्ड ऑस्टिन (1951) मध्ये तर्कशक्ति प्रणालीच्या संरचनेच्या मूळ विकासाचे वर्णन केलेले आहे. ब्रूनर (1983) किशोरवयीन मुलांच्या भाषा शिकण्यावर जास्त केंद्रित आहे.

लक्षात घ्या की कार्यप्रवर्तकता ही विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील एक विस्तृत सैध्दांतिक संरचना आहे आणि ब्रूनरचा सिध्दांत एका विवक्षित परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करतो.

उदाहरण: हे उदाहरण ब्रूनर (1973) मधून घेण्यात आले आहे:

‘अविभाज्य अंकांची संकल्पना मुलांना चटकन् कळणारी आहेसे वाटते, जेव्हां रचनेच्या द्वारे, मुलास हे कळते की मूठभर शेंगा दिलेल्या उभ्या आणि आडव्या वाफ्यांमध्ये पेरल्या जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारच्या मात्रा फक्त एकाच फाइलमध्ये टाकल्या जाऊ शकतात किंवा एखाद्या अपूर्ण रो-कॉलमच्या डिझाईनमध्ये ज्यामध्ये नेहमीच एक जास्तीची किंवा एक अशी की ज्यामध्ये भरण्यासाठी अगदी थोडी जागा असेल. हे नमुने, मूल शिकते, त्याला प्राइम म्हणतात. ह्या पायरीवरून मात्रांच्या पूर्ण केलेल्या मल्टिपल कॉलम आणि रोमधील, तथा कथित, रेकॉर्ड शीटपर्यंत पोचणे मुलासाठी सोपे असते. येथे संरचनेत विघटन, गुणन आणि प्राइम दिसून येतात.’

सिध्दांत
1. निर्देशांचा संबंध हा अनुभव आणि मुलांमध्ये शिकण्याची इच्छा (तयारी) व योग्यतेच्या संदर्भात असावा.
2. विद्यार्थ्याला सहज समजेल अशा स्वरूपात निर्देशांची रचना असावी स्पसयरल ऑर्गनायझेशन).
3. (दिलेल्या माहितीच्या पलिकडे जाऊन) जागा भरणे किंवा एक्सट्रापोलेशन सुलभ करणे या साठी निर्देशांची रचना केलेली असावी.
स्त्रोत: tip.psychology.org/bruner.html

अनुभवात्मक शिक्षण
अनुभवात्मक शिक्षण सिध्दांत (ईएलटी) (ELT) ज्ञानार्जन प्रणालीला एक आध्यात्मिक व विकासाचे बहुपटलीय प्रारूप देते, ज्या दोहोंचा ही संबंध लोकांसंबंधी आपणांस माहित असलेल्या शिक्षण, वाढ आणि विकासाशी निगडित आहे. ह्या सिध्दांतास शिक्षण प्रणालीतील अनुभवांच्या केंद्रीय भूमिकेवर बळ देण्यासाठी ‘अनुभवात्मक शिक्षण’ असे म्हणतात. ह्यामुळे इतर शिक्षण प्रणालींपासून ईएलटीचा वेगळेपणा दिसून येतो. ‘अनुभवात्मक’ हा शब्द ईएलटीला संज्ञानात्मक शिक्षण सिध्दांत, ज्यांचा भर संज्ञानात्मक सिध्दांतावर, आणि वर्तनीय शिक्षण सिध्दांत जो शिक्षण प्रणालीमध्ये कोणत्या ही आत्मनिष्ठ अनुभवाची भूमिका नाकारतो, यांच्यावर अवलंबून आहे.

अनुभवात्मक शिक्षण सिध्दांत शिक्षणाला अशा प्रकारे परिभाषित करतो, ‘अशी प्रणाली ज्यायोगे अनुभवांचे रूपांतर होते व ज्ञानाची रचना होते. आकलनशक्ती आणि अनुभवांच्या रूपांतराच्या मिश्रणाचा परिणाम ज्ञान होय’.