शिकविणे आणि शिकणे भाग - ४

पुनरावलोकन

रॉजरने दोन प्रकारच्या शिक्षणांची विविधता दाखविली: संज्ञानात्मक (अर्थहीन) व अनुभवात्मक (महत्त्वपूर्ण). तो शैक्षणिक ज्ञानाबद्दल बोलतो जसे शब्दावली शिकणे किंवा पाढे पाठ करणे आणि नंतर प्रत्यक्ष ज्ञानाचा संबंध सांगतो जसे कार दुरूस्त करण्यासाठी इंजिनाचा अभ्यास करणे. अनुभवात्मक शिक्षण हेच शिकणार्याच्या इच्छा व गरजांना संबोधित करते आणि हीच श्रेष्ठत्वाची गुरूकिल्ली आहे. रॉजरने अनुभवातमक शिक्षणाच्या गुणवत्ता अशा प्रकारे दिल्या आहेत: वैयक्तिक सहभाग, स्व-पुढाकार, शिकणार्याच्याद्वारे मूल्यांकन, आणि शिकणार्यावर पडणारा प्रसृत प्रभाव.

रॉजरसाठी, अनुभवात्मक शिक्षण हे वैयक्तिक बदल व वाढ यांच्यासारखेच आहे. रॉजरला असे वाटते की सर्व मनुष्यप्राण्यांची शिकण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते; अशा शिक्षणास सुविधा पुरविण्याची भूमिका शिक्षकाची असते. ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
1. शिकण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार करणे,
2. विद्यार्थ्या (र्थ्यांच्या) च्या उद्देशास स्पष्ट करणे,
3. शिक्षणाची साधने उपलब्ध करविणे आणि त्यांचे आयोजन करणे,
4. शिक्षणाचे बुध्दिमत्तापूर्ण व भावनात्मक घटक यांचा समतोल राखणे, आणि
5. वर्चस्व न गाजविता विद्यार्थ्यांचे विचार व संवेदनांमध्ये सहभागी होणे.


रॉजरच्या मते, शिकणे तेव्हां सोयीचे असते जेव्हां

1. विद्यार्थी शिक्षण प्रणालीत पूर्णपणे सहभागी होतो आणि त्याच्या स्वभावावर आणि दिशेवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते,
2. हे प्राथमिकरीत्या प्रात्यक्षिक, सामाजिक, वैयक्तिक आणि संशोधन समस्यांना सामोरे
जाण्यावर आधारित असते, आणि
3. स्व-मूल्यांकन ही यशाचे किंवा प्रगतीचे मूल्यांकन करण्याची मुख्य पध्दत आहे. शिकून घेणे शिकण्याचे महत्व आणि परिवर्तनाबाबत उदात्तपणा ह्यावर रॉजर भर देतो.

कार्यान्वयन
अनुभवात्मक शिक्षण ही एक उच्च महत्त्वपूर्ण शिक्षण पध्दत ठरू शकते. ही पध्दत विद्यार्थ्यास त्याच्या इच्छा व गरजांना संबोधित करून वैयक्तिक पातळीवर त्याला सहभागी करून घेते. स्व-पुढाकार आणि स्व-मूल्यांकन अनुभवात्मक शिक्षणासाठी आवश्यक असलेले गुण आहेत. अनुभवात्मक शिक्षण प्रभावी ठरावे म्हणून, संपूर्ण शिक्षण चक्र वापरायला हवे, ज्यामध्ये लक्ष्य निर्धारणापासून, अवलोकन आणि अनुभव घेण्यापर्यंत ते, पुनरावलोकन करून, आणि शेवटी योजना अमलांत आणण्यापर्यंत सर्व असते. ही संपूर्ण प्रक्रिया नवीन कौशल्ये शिकविते, नवीन दृष्टिकोण किंवा अगदी संपूर्ण नवीन विचारसरणी देखील देते.
आपण लहान होतो तेव्हांचे खेळ आठवतात का? सोपे खेळ, जसे लंगडी खेळणे, हे तुम्हांला पुष्कळशा मौल्यवान शैक्षणिक आणि सामाजिक कुशलता शिकविते, म्हणजे गट प्रबंधन किंवा टीम मॅनेजमेंट, इतरांशी बोलणे-संभाषण-संपर्क इत्यादि आणि नेत्तृत्व. अनुभवात्मक शिक्षण तंत्रात खेळ लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे त्यांतील ‘गंमत’ होय-खेळांच्या माध्यमाने शिकलेल्या गोष्टी फार काळापर्यंत लक्षांत राहतात.

पुष्कळसे शिकविणारे शिक्षण पध्दतीमध्ये खेळसंचे महत्व जाणतात. एक खेहकर वातावरण, जेथे हास्य खळाळत असते आणि विद्यार्थ्याच्या योग्यतांबद्दल आदर बाळगला जातो, अनुभवात्मक शिक्षणाचे एक प्रभावी वातावरण ठरते. अनुभवात्मक शिक्षणात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खेळात सहभागी होऊ देणे हे फार महत्वाचे आहे, म्हणजे त्यांचा समजूतदारपणा वाढून मिळालेली माहिती ते फार जास्त काळपर्यंत लक्षांत ठेवतात.