शिकविणे आणि शिकणे भाग - ६

शिकविणे आणि शिकण्यासंबंधीच्या नीती

6ई+एस निर्देशांचे प्रारूप
6 ई व एस (एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट, इव्हॅल्युएट, एक्सटेंड आणि स्टँन्डर्डस्) लेसन प्लॅन प्रारूपाचा विकास शाळांमधील शिक्षकगणांशी चर्चा करूनच करण्यात आला आणि हे शिकविण्याच्या कार्यप्रवर्तक प्रारूपावरच आधारित आहे. लेसन प्लॅनस् कार्यप्रवर्तक निर्देशात्मक प्रारूपांवर गतिविधि व योजनेच्या चरणांसह संरचित असून विद्यार्थ्यांनी वर्तमान कालीन ज्ञानाचा कळस गाठावा ह्यासाठी नवीन ज्ञानात निरंतर भर घालण्यावर (किंवा रचनेवर) आधारित आहेत.

6 ईंमधील प्रत्येक ई शिकण्याबाबतच्या एका चरणाचे वर्णन करतो, आणि प्रत्येक चरण किंवा पायरी ईपासूनच सुरू होते. ई - एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एलॅबोरेट, इव्हॅल्युएट, एक्सटेंड. हे 6 ई विद्यार्थी व शिक्षकांना सामान्य गतिविधिंचा अनुभव घेण्यास, पूर्वज्ञान आणि अनुभवांची बांधणी व उपयोग करण्यास, अर्थ निर्माण करण्यास, आणि त्यांच्या एखाद्या संकल्पनेच्या समजूतदारपणाचे सतत मूल्यांकन करण्यास मदत करतात,

एंगेज
‘एंगेज’ गतिविधिद्वारे पूर्व व वर्तमानकालीन शिक्षण अनुभवांची जोडणी करता आली पाहिजे, वर्तमान गतिविधिंच्या परिणामांबाबत विद्यार्थ्यांच्या विचारसरणीचा आढावा घेऊन त्यावर केंद्रित होता यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षित होण्यासाठी मानसिक स्वरूपात संकल्पना, प्रक्रिया, किंवा कौशल्य यांच्यात एंगेज व्हायला पाहिजे. प्रत्येक लेसन प्लॅनमध्ये एक ‘अत्यावश्यक प्रश्न’ असतो जो त्यांच्या मूळ चौकशीकरीता आधार ठरतो. सामान्यपणे ह्या सेक्शनमध्ये काही महत्वपूर्ण प्रश्न असतील ज्यायोगे तुम्हांला एक्सप्लोर सेक्शनमधील काही संशोधनाबाबत मदत करतील.

एक्सप्लोर
येथे विद्यार्थी जास्त पध्दतशीरपणे विषयाचे अन्वेषण करतो. येथे महत्वाचे म्हणजे असे की विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या मार्गाचे ‘स्वतंत्र चक्र’ साधनांच्या स्वरूपात दिले जाते आणि कोणता ही निर्देश दिला जात नाही. त्यांना काही निर्देशांची गरज भासेल आणि शिक्षक फिरत राहून, महत्वाचे प्रश्न विचारून, त्यांचे आपसांतील संभाषण ऐकून आणि ते काम करीत आहेत ह्याची दक्षता घेईल.

एक्सप्लेन
ह्या चरणांत विद्यार्थ्यांना ते संशोधन करीत असलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यास मदत मिळते. त्यांना त्यांच्या संकल्पनात्मक समजूतदारपणाचे वर्णन करण्याची किंवा त्यांचे नवीन कौशल्य किंवा आचरण दाखविण्याची संधी मिळते. ह्या चरणांत शिक्षकांना देखील औपचारिक शब्द, परिभाषा/व्याख्या, आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण, प्रक्रिया, कौशल्ये किंवा आचरण दाखविण्याची संधी मिळते.

एलॅबोरेट
येथे विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम प्रत्यक्ष करावे ही अपेक्षा असते. त्यांचे स्वत:चे शोध व नवीन माहितीचे कार्यान्वयन इतरांसमोर ठेवण्याची ही त्यांना एक संधी असते. मूल्यांकनासाठी सामग्री देण्याची, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची आणि प्रस्तुतीकरण देण्याची ही उपयुक्त संधी असते.

इव्हॅल्युएट
जेथे ह्या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान मूल्यांकन चालू राहावे अशी अपेक्षा असते, तेथे हेच ते सेक्शन आहे जेथे किती शिक्षण ग्रहण करण्यात आले ह्याचे मूल्यांकन शिक्षक करतात. सामान्यपणे विद्यार्थी आपल्या असाइनमेंटस् ह्या वेळी शिक्षकांना सोपवितात. ह्या वेळी विद्यार्थ्यांना स्व-मूल्यांकन, समूह/गट मूल्यांकन आणि त्यांनी स्वत:ची साधने विकसित करावीत ह्यासाठी प्रोत्साहन देणे फार गरजेचे असते.

एक्सटेंड
ह्या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना लेसन/धड्याच्या ही पलिकडे घेऊन जाणार्या सूचना असतात. ह्या मागचा उद्देश नवीन आणि अपरिचित परिस्थितींच्या दरम्यान त्यांचा समजूतदारपणा कसा दिसून येतो ते पहाणे व त्यांचे शोध इतरांसमोर कशा प्रकारे ठेवतात ते पाहणे हा असतो. साधारणपणे, ह्या प्रकारची गतिविधि त्यांनी जे काही प्राप्त केले त्यामुळे त्या उत्कंठेमुळे विकसित होईल. हे सेक्शन विद्यार्थीचलित आहे, तथापि शिक्षक हळुवारपणे सुचवितात की विद्यार्थ्यांनी त्यांचे काम एखाद्या प्रतिस्पर्धेला द्यावे किंवा त्यांच्या स्वत:च्या शाळेबाहेरील इतर जागी प्रदर्शनास न्यावे.