शिकविणे आणि शिकणे भाग - ७

मानदंड
लेसन प्लॅन ते लेसन प्लॅन, ह्याप्रमाणे मानदंड सध्या एकत्रित व्हायच्या प्रक्रियेत आहेत. ह्या सेक्शनमध्ये, धडे/लेसनची जुळणी राज्य, प्रादेशिक आणि/किंवा राष्ट्रीय मानदंडाशी करण्यात येते. हे प्राथमिक पातळीवर शिक्षकांच्या माहितीसाठी आहे आणि स्थानिक मंडळात, जिल्ह्यात किंवा शालेय अभ्यासक्रमात आवश्यक ती माहिती देण्यासाठी आहे.
स्त्रोत: www.nortellearnit.org

भूमिका वठविणे व सोंग करणे
परस्परक्रियात्मक शिक्षण नीती जसे भूमिका वठविणे व सोंगे करणे ह्यासारखी कामे तेव्हांच उत्तम ठरतात जेव्हां ती विद्यार्थ्यांना सहज देण्यात येतात. भूमिका वठविण्याचा प्रभावी उपयोग, तथापि, तयारी हवी असते, एक सुपरिभाषित प्रारूप, स्पष्टपणे परिभाषित करण्यात आलेले लक्ष्य आणि परिणाम, आणि सोंग केल्या नंतर थोडा-सा वेळ संक्षिप्त चर्चेसाठी. भूमिका वठविणे आणि सोंगे करणे ह्यापासून विद्यार्थ्यांनी त्यांना अवगत असलेल्या माहितीचा उपयोग करावा हे आवश्यक असते. ह्या प्रक्रियेत, ते महत्वपूर्ण विचार आणि सहकारितापूर्ण शिकणे ह्यास प्रोत्साहन देतात. ही शिक्षण साधने विद्यार्थ्यांना दृष्टिकोन आणि संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करतात आणि वास्तविक विश्व प्रसंग व सारांशित संकल्पना यांच्यात दुवा जोडण्यासाठी मदत करतात.

एका बहु-वय वर्गास शिकविणे
एका बहु-वय वर्गात, विद्यार्थ्यांच्या वैविध्याचा फायदा उचलून शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते. युनिटचे आयोजन प्रतिपाद्य विषयाप्रमाणे करण्यात येते, आणि युनिटच्या आंतच प्रत्येक ग्रेड पातळीवर वेगवेगळ्या असाइनमेंटवर काम करतात. विद्यार्थ्यांना एकमेकांस खेळीमेळीच्या वातावरणात मदत करण्यास प्रोत्साहन देण्यात येते आणि वेगवेगळ्या वयोगटातील आणि पात्रता पातळीच्या विद्यार्थ्यांतील भिन्नतांचा विचार केला जातो. सहकारी कामांत, लहान वयाच्या विद्यार्थ्यांसाठी जुने विद्यार्थी आदर्श व सदुपदेशक ठरतात.

बहु-वय वर्गांमध्ये शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांची विविध वयांना संबोधित करण्यासाठी, ग्रुपिंगच्या नवीन नमुन्यांचे लवचिक कार्यान्वयन करण्यासाठी, विशिष्ट शिक्षण लक्ष्यपूर्तीसाठी, सर्व विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी, तसेच स्वत:साठी आणि परस्परांसाठी मनामध्ये आदराची भावना राखण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते.

सहकारी शिक्षण
सर्व प्रकारच्या शिक्षक-नीतींमधील उत्तम संशोधित नीती ही सहकारी शिक्षण होय. ज्या विद्यार्थ्यांना एकत्रपणे शिकण्याची संधी मिळते, ते लवकर आणि दक्षतेने शिकतात, त्यांची संग्राह्य शक्ती वाढते, आणि ते शिक्षण घेण्याच्या अनुभवाबाबत जास्त सकारात्मक असतात. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्यांना एक प्रकल्प पूर्ण करण्यास सांगतात. समूह भावनेने कार्य करून यशस्वी होण्यासाठी पुष्कळशा पध्दती आहेत, पण शिक्षक व विद्यार्थी अशा दोघांना ही त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. अलिकडेच ह्या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग करण्यात आल्याबद्दल टीका करण्यात आली होती. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, ही पध्दत अशी नाही की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे गट काम करीत आहेत व शिक्षक पेपर तपासत असून ‘गेट ऑफ द हुक’ (अंग झाडून मोकळे होणे किंवा अलिप्त राहणे) असतात. ‘गिफ्टेड’ विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या गटांचा इनचार्ज नेमून सतत त्यांच्या गरजांना संबोधित करण्याचा हा मार्ग नव्हे. विद्यार्थ्यांनी अंर्तवैयक्तिक जीवन-कौशल्ये शिकावीत आणि त्यांच्या समूह भावनेने कार्य करण्याच्या योग्यतेचा विकास व्हावा ह्यासाठी असलेला हा मार्ग आहे – असे कौशल्य आजच्या काळात कार्यस्थळी सर्वांत जास्त आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आळीपाळीने विविध भूमिका पार पाडाव्यात जसे फॅसिलिटेटर, रिपोर्टर, रेकॉर्डर इत्यादि ह्यासाठी हा मार्ग आहे. एका सहकारी गटामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्याचे एक विशिष्ट कार्य असते, प्रत्येकाने शिकण्यामध्ये किंवा प्रकल्पात सहभागी व्हायचे असते, आणि कोणी ही ‘पिगीबॅक’ (पाऊल मागे घेणे) करू शकत नाही. गटाचे किंवा समूहाचे यश हे प्रत्येकाच्या यशस्वी कामावर अवलंबून असते.