शिकविणे आणि शिकणे भाग - ८

स्वत:ला व आपल्या गटातील सहकारीगणास शिकण्यास मदत करण्यासाठी विद्यार्थी शैक्षणिक कार्यांमध्ये एकत्रितपणे काम करतात. सर्व साधारणपणे, सहकारी शिक्षण पध्दतीत खालील पांच लक्षणांचा समावेश असतो.

· विद्यार्थी सामाईक कार्यांवर किंवा शिकण्याच्या कामांत एकत्रितपणे काम करतात जी समूह भावनेमुळे उत्कृष्टपणे हाताळण्यात येतात.
· दोन किंवा पांचाच्या लहान गटात विद्यार्थी काम करतात.
· विद्यार्थी त्यांची सामाईक किंवा शिकण्याची कामे करण्यासाठी सहकार्यपूर्ण, सामाजिक आचरणाचा उपयोग करतात.
· विद्यार्थी स्वतंत्र असतात. कामांची रचना अशा प्रकारे करण्यात येते की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची सामाईक कामे करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एकमेकांची गरज पडते.
· विद्यार्थी त्यांच्या शिकण्याकरीता किंवा काम पूर्ण करण्यासाठी वैयक्तिकरीत्या जवाबदार असतात.

शिकण्याच्या पध्दती
शिकण्याच्या पध्दती म्हणजे शिकण्याचे विविध प्रकार किंवा मार्ग होय.
शिकण्याच्या पध्दतीच्या प्रकार कोणते?
व्हिज्युअल लर्नर्स: पाहून शिकणारे......
एखाद्या धड्यातील घटक पूर्णपणे समजण्यासाठी या व्यक्तीना शिक्षकाच्या शारीरिक हावभाव व चेहर्यावरील भाव बघण्याची गरज असते. वर्गामध्ये सर्वांत पुढे बसण्याकडे त्यांचा कल असतो ज्यायोगे त्यांना निरीक्षण करण्यात किंवा पाहण्यात अडथळे येणार नाहीत (उदा, लोकांची डोकी). ते चित्रात्मक पध्दतीने विचार करतात आणि दृष्यमान प्रदर्शनांमधून शिकतात: जसे, आकृत्या, सचित्र पुस्तके, उंचीवरील पारदर्शकता/दृष्यमानता, व्हिडिओ, फ्लिपचार्टस् आणि हैंडआउटस्. एखाद्या व्याख्यानाच्या किंवा वर्गचर्चेच्या दरम्यान, या व्यक्ती लर्नर्स माहिती गोळा करण्यासाठी नोटस् लिहून घेणे रास्त समजतात.

ऑडिटरी लर्नर्स: ऐकून शिकणारे.......
ते मौखिक भाषणे किंवा व्याख्याने, चर्चा, आणि इतर लोक काय बोलत आहेत त्यातून शिकतात. ऐकून शिकणारे भाषणाच्या दरम्यान येत असलेल्या आवाजाची टीप, लकब, गति, आणि इतर वैशिष्ट्ये लक्षांत घेऊन शिकतात. लेखी माहिती ऐकल्याशिवाय त्याला फारसे महत्व नसते. या व्यक्ती धडे मोठ्याने वाचून आणि टेप रेकॉर्डरचा वापर करून शिकतात.

गतिशास्त्रक्षम/स्पर्शजन्यताक्षम लर्नर्स : : हालचाली, क्रिया व स्पर्श यांच्या माध्यमाने शिकतात.......
गतिशास्त्रक्षम/स्पर्शजन्यताक्षम लर्नर्स त्यांच्या भोवती असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्शाद्वारे जाणून घेऊन सक्रियपणाने शिकतात. एका जागी जास्त वेळ बसणे त्यांना जड जाऊ शकते आणि हालचाल करण्याच्या व शोध घेण्याच्या त्यांच्या शरीरिक गरजेमुळे त्यांचे लक्ष न लागणे असे प्रकार होऊ शकतात.